Challage to Search Third 8 In The Playing Card: ऑप्टिकल इल्यूजन असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता तर ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं की, लोकं चुटकीसरशी सोडवतात. एखाद्या फोटोतील दडलेलं कोडं किंवा विशेष वस्तू शोधणं सोपं झालं आहे. पण तुम्ही कधी पत्ते खेळले असाल तर तुमच्यासाठी आजचं कोडं नवीन आहे. पत्त्यांमध्ये एक्का, दुरी, तिरी ते बादशाहपर्यंत 52 पत्ते असतात. प्रत्येक पत्ता बदाम, इस्पिक, चौकट आणि किलवर या चार प्रकारात येतो. प्रत्येक पत्त्याचं महत्त्व वेगळं आहे. यामध्ये जर तुम्ही चौकट अठ्ठा तर पाहिला असेलच. हा चौकटचा अठ्ठा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तीन अठ्ठे असतात असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरं सांगायचं तर यात तीन अठ्ठे असतात. आज ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला तिसरा अठ्ठा शोधण्याचं चॅलेंज आहे. पण यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेंकदाचा अवधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्त्याच्या वरच्या डाव्या बाजूला आणि खाली उजवीकडे तर 8 हा अंक सहज दिसून येईल. पण तिसरा 8 अंक शोधण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तिसरा 8 शोधताना 7 सेकंद संपून गेली तर काळजी नसावी. पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि शोधून दाखवा. चला बुद्धीला थोडी चालना द्या आणि तिसरा 8 शोधून दाखवा. तुम्हाला 8 अंक सापडला नाही तर आम्ही तुम्हाला मदत करतो. पत्त्यातील चौकट असलेले शेप निरखून पाहा. आता तुम्हाला त्या शेपमध्ये 8 हा अंक दिसून येईल.तरीही 8 हा अंक सापडला नाही तर खाली दिलेला फोटो पाहा.


 


बातमी वाचा- Term Insurance विकत घेताना आणि कवर निश्चित करताना 'या' बाबी लक्षात ठेवा, जाणून घ्या


ब्रिटन गॉट टॅलेंट स्पर्धक जेमी रेवेनने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. चौकट शेपमुळे 8 हा अंक मध्यभागी तयार होतो. काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला दिसेल. हे ऑप्टिकल इल्यूजन जुनं असून हे ट्विट 2018 मध्ये करण्यात आले होते.