Optical Illusion: 10 सेकंदात पुस्तकांच्या गर्दीत शोधा पेन्सिल, 99 टक्के लोकं ठरले अपयशी
पहिल्यांदा टायमर सेट करून 10 सेकंद सुरु करा आणि पुस्तकात लपलेली पेन्सिल शोधा
Genius Brains Can Solve:सोशल मीडियावर एकापेक्षा एक जबरदस्त असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केले जात आहे. या फोटोमुळे बौद्धीक क्षमता पणाला लागते. त्यामुळे या फोटोंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. काही फोटो इतके गुंतागुंतीचे असतात की तीक्ष्ण नजरेतही दडलेली वस्तू शोधणं कठीण होतं. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत बरीच पुस्तकं दिसत आहे. या पुस्तकांच्या गर्दीत एक पेन्सिल शोधण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. इतकंच नाही तर फक्त 10 सेकंदात ही पेन्सिल शोधून दाखवायची आहे. त्यामुळे नजर फिरवताच 10 सेकंद कधी संपतील सांगता येत नाही. यासाठी फोनमध्ये पहिल्यांदा टायमर सेट करून 10 सेकंद सुरु करा आणि पुस्तकात लपलेली पेन्सिल शोधा.
जर तुम्हाला पुस्तकांच्या गर्दीत पेन्सिल दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या खालच्या भागात पेन्सिल शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पेन्सिल दिसली असेल तर तुम्हाला शुभेच्छा. तुमचे डोळे एकदम तीक्ष्ण आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण जर तुम्हाला इतकं करूनही पेन्सिल दिसली नाही तर नो टेन्शन. आम्ही तुम्हाला सांगतो नेमकी पेन्सिल कुठे आहे. यासाठी तुम्हाला खाली दिलेला फोटो पाहावा लागेल.
फक्त 1 टक्के लोकांना मिळालं यश
तुम्हाला याबाबत आश्चर्याचा धक्का बसेल की, फक्त 1 टक्के लोकांना या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील पेन्सिल शोधण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे जर तुम्ही त्या 1 टक्के लोकांमध्ये असाल तर तुमचं खरंच कौतुक आहे. आता तुम्हीही तुमच्या मित्रांना हा फोटो पाठवून यातील पेन्सिल शोधण्याचं आव्हान द्या आणि बघा त्यांचं उत्तर काय येतं ते...