मुंबई : Optical Illusion Viral Photo: ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) आणि पिक्चर पझल्सने  (Picture Puzzles) इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. लोकांना ऑप्टिकल इल्युजनसह चित्रांमध्ये उत्तरे शोधणे आवडते. मात्र, अशी चित्रे पाहिल्यानंतर मेंदूवर मोठा जोर द्यावा लागतो. इंटरनेट अशा मनोरंजक ऑप्टिकल भ्रम चाचण्यांनी भरलेले आहे. काहीजण तर डोळे तपासतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटोही काहीसा असाच आहे. या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये तुम्हाला तीन घुबडे शोधावे लागतील.


तुम्ही घुबड या फोटोत पाहिले  का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्यांसमोर असूनही कधी कधी काही गोष्टी दिसत नाहीत. ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) हे चित्र वारंवार पाहिल्यानंतरही लोकांना घुबड दिसत नाही. या चित्रात एकूण तीन घुबड आहेत. तरी तुम्हाला प्रथम एक घुबड दिसेल. त्याचवेळी, उर्वरित  घुबड शोधण्यात तुम्हाला घाम फुटण्याची जास्त शक्यता आहे. चित्र बारकाईने पाहिल्यास आजूबाजूला फक्त झाडांच्या फांद्या आणि हिरवी पानं दिसतील, पण या झाडाच्या फांद्यावर घुबड कुठे बसले आहेत हे पाहावं लागेल.


यूजर्सना झाडाच्या फांदीवर बसलेले घुबड शोधावे लागेल


काही लोकांचा असा दावा आहे की, गरुडापेक्षा तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांना तीन घुबड सापडले नाहीत. काहींना ते सहज सापडले, तर काही जण बराच वेळ डोके खाजवत राहिले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये यूजर्सला झाडांच्या फांद्यावर बसलेले घुबड सापडले आहे. तुम्ही अजून पाहिलं नसेल तर काही फरक पडत नाही, आम्ही तुम्हाला सांगतो घुबड कुठे बसले आहेत. घुबड कुठे बसलेले दिसतात ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या चित्रांवर एक नजर टाका. झाडांवर बसलेले घुबडे तुम्हाला अस्पष्ट दिसतील, परंतु ज्याला ते सापडेल त्याला 'सुपरजीनियस' म्हटले जाईल.