Optical Illusion | या चित्रात एकूण किती चेहरे? अचूक आकडा सांगताना भले भले गडबडले
Optical Illusion: अनेकदा आपल्या डोळ्यांना भ्रम निर्माण करणारे फोटो आपण पाहत असतो. असे फोटो प्रथमदर्शनी पाहिल्यास आपल्याला गोंधळात टाकतात. त्यासंदर्भातील उत्तरे शोधण्यास आपल्याला वेळ लागतो.
मुंबई : Optical Illusion Viral Photo | सोशल मीडियाच्या जगात ऑप्टिकल इल्युजनचे फोटो नेहमीच फिरत असतात. या फोटोंबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. अनेक फोटोंमध्ये कोडी लपलेली असतात. अशा फोटोंमधील प्रश्न इतके अवघड असतात की, ते सोडवताना किंवा शोधताना भल्याभल्यांची दमछाक होते.
असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या फोटोंमध्ये अनेक चेहरे लपले आहेत. या फोटोंमध्ये नक्की चेहरे किती याबाबत योग्य आकडा सांगणं अनेकांना अवघड जात आहे.
येथे देण्यात आलेल्या फोटोमध्ये नक्की किती चेहरे दिसताय ते शोधा... तुमच्याकडे ३० सेकंद आहे.
एका चित्रात एकूण सात चेहरे लपलेले आहेत.
हे चित्र एका वृद्ध व्यक्तीचे असून यातच सात चेहरे ओळखण्याचे आव्हान आहे.
पण हजारो लोकांपैकी मोजकेच लोक असतील जे या फोटोतील सात चेहरे ओळखू शकतील. तुम्हीही हुशार असाल तर फोटोमधील सात चेहरे ओळखण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला या फोटोमधील 7 चेहरे ओळखता आले नसतील तर, आम्ही त्याचे उत्तर देत आहोत. परंतू त्या आधीच या फोटोमधील 7 चेहरे तुम्ही शोधले असतील... तर तुम्ही चाणक्ष आहात असं समजा...