Optical Illusion: फोटोत दडलाय `पपी`, फक्त 9 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टीकल इल्यूजन फोटोमध्ये तुमच्या डोळ्यांना चक्रावणाऱ्या गोष्टी घडत आहेत.
मुंबई : इंटरनेटच्या दुनियेत आपल्यासमोर काही ना काही गोष्टी येतच असतात. हे आपलं मनोरंजन करतात तर काही गोष्टी आपल्याला विचारात पाडतात. सध्या लोकांचा कल ऑप्टीकल इल्यूजनकडे आहे आणि लोकांना अशी कोडी सोडवायला फार आवडते. खरंतर ऑप्टीकल इल्यूजनचे फोटो आपल्या मेंदूला चालना देतात आणि आपल्या डोळ्यांना धोका देतात. परंतु असं असुन देखील ज्या लोकांना यामधील कोडं सोडवता येतं, ते लोक फारच हुशार सिद्ध होतात.
या व्हायरल ऑप्टीकल इल्यूजन फोटोमध्ये तुमच्या डोळ्यांना चक्रावणाऱ्या गोष्टी घडत आहेत. सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सुंदर लहान-लहान झाडी आहेत. या फोटोमध्ये अनेक पक्षी देखील आहेत.
फोटोत आजूबाजूला अनेक कुंड्या दिसत आहेत ज्यात रंगीबेरंगी फुले आहेत. या कुंड्याच्या मध्यभागी श्वानाचं पिल्लू म्हणजेच पपी लपलेला आहे. या फोटोमधील पपी शोधण्यासाठी तुम्हाला नजर तीक्ष्ण करावी लागेल. बहुतेक लोक फोटोमध्ये पपी शोधण्यात अपयशी ठरले आहेत.
जर तुम्ही उजव्या हाताकडे बघितले तर तुम्हाला एक भांडं दिसेल जिथे एक श्वानाचं पिल्लू लपलं आहे. खालील फोटोत, आम्ही तुम्हाला लाल वर्तुळात पिल्लू कुठे आहे ते दाखवलं आहे.