फोटोमधील हरण शोधून दाखवलं तर मानलं तुम्हाला!
99 टक्के लोकं अपयशी ठरलेत, तुम्हाला सापडलं का?
Optical Illusio Photo : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक हरिण लपलं आहे तुम्हाला अवघ्या 5 सेकंदात शोधून दाखवायचं आहे.
या फोटोमध्ये आपल्याला झाडे, सूर्य, डोंगर दिसत आहेत त्यामुळे नेमक हरण कुठे आहे दिसत नाही. सुरूवातीला प्रत्येकाला वाटलं असेल की अरे हे तर सोपं आहे. मात्र तसं नाही कारण तुम्ही निरखून जरी पाहिलं तरी हे हरण तुम्हाला दिसलं नसावं.
5 सेंकद झाली आणि तुम्ही फोटोमधील हरण शोधण्यात यशस्वी झालात तर तुमची नजर चांगली आहे. त्यासोबतच तुमची निरीक्षण करण्याची क्षमताही चांगली आहे. मात्र काहींना अजूनही सापडलं नसेल तर काळजी करू नका, खाली एक फोटो दिला आहे. त्यामध्ये हरण कुठे आहे ते सांगण्यात आलं आहे.