Optical Illusion Spot: ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील. या फोटोतील कोडं सोडवण्यासाठी बुद्धीचा कस लागतो. काही फोटोत एक किंवा दोन वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज आम्ही तुम्हाला दिलेल्या फोटोतील एक दोन नव्हे तर सात वस्तू शोधून दाखवायच्या आहेत. पण यासाठी तुम्हाला फक्त 15 सेकंदाचा वेळ दिला आहे. जर तुम्ही 15 सेकंदात फोटोत दडलेल्या वस्तू शोधून दाखवल्या तर 2 टक्के व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होईल. कारण आतापर्यंत 15 सेकंदात 7 वस्तू शोधण्यात 98 टक्के लोकांना अपयश आलं आहे. त्यामुळे चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी घड्याळ्यात 15 सेकंदाचं वेळ लॉक करा आणि शोध मोहीम सुरु करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅक अँड व्हाईट फोटोत एक बाग दिसत आहे.  त्याच एक खारूताई खेळताना दिसत आहे. एक पक्षी एका झाडाच्या फांदीवर बसलेला दिसत आहे. त्याचबरोबर पानं, जनावरं आणि गवत बघू शकता. यात 7 वस्तू दडल्या आहेत. त्या वस्तू तुम्हाला शोधायच्या आहेत. चला तर मग फोटोतील वस्तू शोधून दाखवा.



फक्त 2 टक्के लोकंच फोटोत दडलेला मासा शोधण्यास यशस्वी ठरले. ऑप्टिकल इल्यूजन फोटोत दडलेल्या 7 वस्तू शोधण्यात तुम्हाला अपयश आलं असेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला या वस्तू नेमक्या कुठे आहेत ते सांगतो. झाडाजवळ खेळणारी खारूताई तुम्ही पाहू शकतो. एक एक करून वस्तू शोधा. आम्ही तुम्हाला या चित्रात लपवलेल्या वस्तू काय आहेत ते सांगतो. तुम्हाला मासे, ट्यूलिप, आइसक्रिम, बॉल, कलर पेन्सिल, चमचा आणि चंद्र दिसेल.



तुमच्या बुद्धीवरचा ताण कमी झाला असेल तर इतरांना ऑप्टिकल इल्यूजनचं आव्हान द्या. त्यांना फक्त 15 सेकंदात या फोटोत दडलेल्या वस्तू शोधता येतात की नाही ते पाहा. त्यानंतर त्यांना नेमक्या वस्तू कुठे दडल्या आहेत, याची माहिती द्या.