11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले खेकडे, 99 टक्के लोक ठरले अपयशी
`या` फोटोत लपलेले 4 खेकडे शोधून दाखवा, अनेकांना जमलं नाही तुम्हाला जमतंय का पाहा?
मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही फोटो स्टार्सचे असतात, तर काही फोटो ऑप्टीकल इल्युजनचे (optical illusion) असतात. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ऑप्टीकल इल्युजनचा (personality optical illusion) आहे. या फोटोत तुम्हाला 4 खेकडे शोधायचे आहेत. तुम्हाला हे खेकडे शोधता येतायत का पाहा?
ऑप्टीकल इल्युजनच्या या फोटोत तुम्हाला कोलंबीने भरलेला समुद्र दिसेल. या फोटोत कोलंबी सोबत काही स्टारफिश आणि गोगलगाय देखील आहेत. मात्र या सर्व जलचर प्राण्यात तुम्हाला खेकडे शोधायचे आहेत. तुम्हाला हे खेकडे शोधून तुमची बुद्धी आणि नजर किती तिक्ष्ण आहे, ते दाखवून द्यायचे आहे.
फोटोतून तुम्हाला 11 सेकंदात कोलंबीमध्ये लपलेले 4 खेकडे शोधावे लागतील. दिसायला हे ऑप्टीकल इल्युजन सोप्प वाटतं असेल मात्र तसे नाही आहे. कारण हे सहजासहजी सापडणारे खेकडे नाहीयेत.
तुम्हाला खेकडे सापडत नसतील तर आम्ही काही क्लू देतो. एक खेकडा तळाशी लपला आहे. तर दुसरा उजवीकडील बाजूस आहे. तर तिसरा हा डावीकडे वरच्या बाजूस आहे. तर चौथा खेकडा हा वरच्या बाजूस मधोमध आहे.
ही चित्रे पाहिल्यानंतर तुमचे डोके चक्रावून जाईल पण तुम्ही तुमच्या मनावर जितका ताण द्याल तितके तुमचे मन तीक्ष्ण होईल.आपला मेंदू कसा कार्य करतो हे ऑप्टिकल भ्रम नेहमी स्पष्ट करते.