optical  illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक घुबडांचा फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोतला खरा खुरा घुबड तुम्हाला शोधायचा आहे. अनेकांना या फोटोतील खरं घुबड शोधण्यात अपयश आलं आहे. तुम्हाला यातलं खरं घुबड शोधण्यात यश येतंय का ते पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत काय? 
या फोटोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी घुबड बाहुल्या एका रांगेत मांडलेल्या पाहायला मिळतील.  
आता तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हे शोधून काढायचं आहे. कारण या घुबडांमध्ये खरंखुरं घुबडही बसलं आहे आणि कमीत कमी वेळात खरे घुबड शोधण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. खेळण्यांमध्ये असलेले खरे घुबड अवघ्या 5 सेकंदात तुम्ही शोधले पाहिजे. 


जर तुमचे उत्तर नाही असेल, तर पुन्हा चित्र पहा; आपण घुबड ओळखू शकता. आशा आहे की तुमच्यापैकी काहींनी आधीच घुबड पाहिले असेल.ज्यांनी अद्याप घुबड दिसले नाही त्यांनी निराश होऊ नका. सरावाने, तुम्ही तुमचे निरीक्षण कौशल्य देखील सुधारू शकता


रंगीबेरंगी खेळण्यांमध्ये बसलेले हे घुबड अवघ्या पाच आठवड्यांचे आहे. या फ्लफ बॉल जातीच्या घुबडाचा उगम वेस्ट लोथियन येथील स्कॉटिश घुबड केंद्रात झाला. केंद्रात जाऊन या घुबडाचा फोटो क्लिक केला आणि आता तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.