Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोने लोकांना वेड लावलं आहे. हा फोटो अतिशय साधा आहे मात्र याच्याशी संबंधित एक चॅलेंज तुम्हाला पूर्ण करायचं आहे. या फोटोत एक-दोन नाही तर तब्बल 13 प्राणी लपले आहेत. हे प्राणी तुम्हाला अवघ्या 10 सेकंदात शोधून काढायचे आहेत. या ऑप्टिकल इल्युजनने तुमचा मेंदूच नाही तर डोळे देखील तल्लख होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Optical Illusion सारखे गेम आहेत जे अगदी हुशार लोकांचेही मन खिळवून ठेवू शकतात. याची उत्तरं शोधतानाही मनोरंजन होतं. तुम्हालाही तुमच्या कुशाग्र बुद्धीची आणि डोळ्यांची चाचणी घ्यायची असेल, तर आजचे चॅलेंज फक्त तुमच्यासाठी आहे. ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंद मिळतील.


काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, पण त्या दिसत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो याच प्रकारातला आहे. या फोटोत एक बलाढ्य हत्ती दिसतोय. या हत्तीत काही लहान-मोठे प्राणी लपले आहेत. सुरुवातीला या फोटोत तीन ते चार प्राणी आपल्याला सहज ओळखता येतात. पण यात एकूण तब्बल 13 प्राणी आहेत.


काही गोष्टी अगदी सोप्या दिसतात. मात्र, याच गोष्टी डोक्यात भ्रम निर्माण करतात. या चित्रांनाच Optical illusion असे म्हंटले जाते. अशा प्रकारची कोडी सोडवताना बुद्धीचा कस लागतो. डोकं चालवावं लागतं. हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर काहीच समजत नाही. मात्र, बारकाईने निरीक्षण केले असता अगदी सहज हे कोडं सोडवता येवू शकतो. अनेकांनी अवघ्या काही सेकंदात हे कोडं सोडवलं आहे.


जर तुम्ही 10 सेकंदानंतरही या फोटोत लपलेले 13 प्राणी शोधू शकला नसाल तर आम्ही तुमच्यासाठी याचं उत्तर देतो.


फोटोत लपलेले प्राणी


1. हत्ती 2. कासव 3. मच्छर 4. मासा 5. पक्षी 6. कुत्रा 7. डॉल्फिन 8. साप 9. मगर 10. मांजर 11. कोंळबी 12. उंदिर 13. गाढव


आम्ही तुम्हाला फोटोत कोणते प्राणी आहेत, याचं उत्तर दिलंय. आता तुम्ही बारकाईने निरखून या फोटोत वर दिलेले प्राणी शोधून काढा. वास्तविक ऑप्टिकल इल्यूजनची ही कोडी सोडवण्यसाठी विचार करण्याची क्षमता जास्त असावी लागते. ही क्षमता तुमच्याकडे असेल तर 10 सेकंदात या फोटोतले प्राणी तुम्ही सहज ओळखू शकता. जर तुम्हाला अजूनही प्राणी सापडले नसतील तर तुम्हाला आणखी सराव करण्याची गरज आहे.