मुंबई : कधीकधी काही चित्रांमध्ये दिसतं तसं प्रत्यक्षात नसते. ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते. अशा चित्रांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत आहेत. नेटिझन्सही अशा चित्रांवर काही सेकंद थांबून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑप्टिकल इल्युजन फोटोने लोकं चक्रावले आहेत. द ब्लॉंडी बॉईज शॉर्ट्स नावाच्या ब्लॉगरने हा फोटो शेअर केला आहे. फोटोकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा अनेकांना पांढरे कपडे घातलेले लोक उभे असलेले दिसले, तर काहींनी त्याच चित्रात आधी एक धबधबा पाहिला. त्यानुसार आपल्या व्यक्तीमत्वाबाबत अंदाज घेता येतो.



जर तुम्ही वाहणारा धबधबा पाहिला असेल तर...


द ब्लॉंडी बॉईज शॉर्ट्सने म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही पहिल्यांदा धबधबा पाहिला असेल, तर तुम्ही समाजिक कामांसाठी वेळ देता, परंतू स्वतःसाठी वेळ काढता आला तर तुम्हाला अशा ठिकाणी जायला आवडते.


पांढऱ्या कपड्यातले लोक पाहिले तर


याव्यतिरिक्त, ब्लॉगरने असेही म्हटले केले की, जर तुम्ही धबधब्याऐवजी पांढर्‍या कपड्यात लोक पाहिले तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला सध्या हरवल्यासारखे वाटत आहेत. स्वतःची वाट शोधण्यासाठी अडथळे येताहेत. पण सकारात्मक बाजू म्हणजे, जीवनात तुमचे ध्येय साध्य करण्याचा तुमचा निर्धार आहे.