लंडन : दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनच्या मुलाचं लग्न झालं आहे. ९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मद अट्टाच्या मुलीसोबत हमजाचा विवाह झाला आहे. ओसामा बिन लादेनचा सावत्र भाऊ अहमद आणि हसन अल अट्टा यांनी हे लग्न झाल्याचं सांगितलं आहे. ब्रिटनचं वृत्तपत्र गार्डियनला या दोघांनी ही माहिती दिली. हमजाचं मोहम्मद अट्टाच्या मुलीशी लग्न झालं आहे. पण ते कुठे आहेत हे आम्ही सांगू शकत नाही, असं त्यांनी गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. पण ते सध्या अफगाणिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लादेनच्या भावांच्या म्हणण्यानुसार हमजा अल कायदामधअये लादेनप्रमाणेच सर्वोच्च स्थान मिळवेल आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला अमेरिककडून घेईल असं लादेनच्या भावांना वाटतंय. लादेनचा अमेरिकेच्या लष्करानं २०११ साली पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये खात्मा केला. हमजा हा ओसामाच्या तीन पत्नींमधली एक असलेल्या खेरियाचा मुलगा आहे. अबोटाबादमध्ये जेव्हा लादेन मारला गेला तेव्हा खेरिया लादेनसोबत होती.


पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर संघटना हमजा कुठे आहे याचा शोध घेत आहेत. लादेनचा एक मुलगा खालिद अबोटाबादमध्ये पडलेल्या एका छाप्यात मारला गेला. तर दुसरा मुलगा अफगाणिस्तानमध्ये २००९ साली ड्रोन हल्ल्यामध्ये मारला गेला. यानंतर हमजा माझा उत्तराधिकारी होईल असे संकेत ओसामानं दिले होते.


लादेनच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी आणि मुलं सौदी अरेबियाला गेले होते. तिकडे त्यांना प्रिन्स मोहम्मद बिन नैयफनं शरणार्थींचा दर्जा दिला होता. लादेनच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलं त्याची आई आलिया घानमच्या संपर्कात आहेत.