मुंबई : माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर हे एक चौफेर व्यक्तिमत्व. ते उत्कृष्ठ लेखक, वक्ते आहेत. तसेच, ते इंग्रजीचेही गाढे अभ्यासक आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या थरूर यांनी ट्विट करताच भले भलेही शब्दकोशाचा आधार घेतात. असा या थरूरांबाबत एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यात त्यांनी 'हिंदी टेस्ट' दिली आहे


सोशल मीडियावर व्हिडिओ भलताच व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही थरूर यांचे केवळ हिंदी ज्ञान पाहात नाही तर, तुम्हाला हसूही येईल. लेखक आणि राजकीय टीकाकार आकाश बॅनर्जी यांनी थरूर यांची हिंदीची टेस्ट घेतली. या व्हिडिओत आकाश बॅनर्ज थरूर यांना हिंदी शब्द सांगत आहेत. आणि थरू त्या शब्दांना इंग्रजीतून प्रतिशब्द देत आहेत.


 मोदी सरकारवरही निशाणा


दरम्यान, ही टेस्ट सुरू असताना थरूर यांनी अनेक शब्दांचे मजेशीर अर्थ सांगितले. पण, सोबतच 'अच्छे दिन', 'जुमला' अशा शब्दांचा अर्थ सांगताना मोदी सरकारवरही चांगलाच निशाणा साधला.



शशी थरूर हे प्रदीर्घ काळ संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचे इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व आहे. त्यांनी ट्विटमध्ये वापरलेले शब्द अनेकदा ट्विटटरवर ट्रोलही होतात.