मुंबई : देशात  कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या तर दिवसागणिक वाढतचं आहे, पण मृत्यू संख्येने पण तांडव घातला आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहाता राज्य आणि केंद्र सरकार अनेक उपाय-योजना राबवत आहेत. तरी देखील रूग्ण संख्या वाढतचं आहे. बुधवारच्या रूग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार 41 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 23 रूग्णांचा  कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना सर्वांनीचं कोरोना नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. 


देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 1,56,16,130 इतकी असून कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रूग्णांची संख्या 1,32,76,039  आहे. गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत 1,82,553 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 21,57,538 रूग्णांवर उपचार सुरू आहे.