आग्रा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ताजमहालला भेट दिली आणि ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात झाडूने साफसफाई केली. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झाडू मारुन ताजमहालचा परिसर स्वच्छ करण्यापेक्षा पक्षातील लोकांच्या डोक्यातील विचारांची सफाई करा', असा टोला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आदित्यनाथ यांना लगावला आहे.


भाजपचे नेते ताजमहालला शिव मंदिर म्हणत, काहींनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचं म्हटलंय. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीका आणि केंद्राकडून दबाव आल्यानंतर, त्यांच्या वर्तनात बदल झाला आणि त्यांना ताजमहालला भेट द्यावी लागली, अशी टीका अससुद्दीन ओवीसी यांनी केली आहे.


भगवे वस्त्र परिधान केलेल्या काही लोकांनी आज ताजमहाल परिसरात पूजा केली. या लोकांना देशातील पर्यटन संपवायचे आहे, अशी कोपरखडी यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावली आहे.


जे लोक ताजमहालला आपल्या संस्कृतीचा हिस्सा मानत नाहीत, ज्यांना ताजमहाल आपला वारसा वाटत नाही, त्यांनाच आज ताजमहाल परिसरात झाडू मारावा लागत आहे, असा टोला  देखील अथिलेश यादव यांनी लगावला.