नवी दिल्ली : ईडीसमोर शरणागती पत्करावी या चिदंबरम यांच्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. सध्या चिदंबरम यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची नसल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. दरम्यान चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी का घेतले नाही ? असा प्रश्न  वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. चिदंबरम तुरुंगात राहावे यासाठी हे सर्व जाणिवपूर्वक केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चिदंबरम यांच्या अर्जावर रॉऊज एवेन्यू कोर्टाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. ईडी समोर चिदंबरम आत्मसमर्पण करु शकतात की नाही हे शुक्रवारी ठरणार आहे. 


आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. या पुढची सुनावणी २३ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयीन कस्टडीला आव्हान देणारी दुसरी याचिका चिदंबरम यांनी मागे घेतली आहे. 


चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी टाळण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी बरेच प्रयत्न केले. न्यायालयीन कोठडीऐवजी चिदंबरम यांना ईडीच्या ताब्यात दिले जावे, असा सिब्बल यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पी.चिदंबरम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.