नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत ईडीने चौकशी सुरु केल्याने त्यांच्या अडचणींत वाढच होत आहे. दरम्यान, चिदंबरम हे न्यायालयात गेले आहे. दरम्यानस सीबीआयकडून पाच दिवसांच्या काठडीची मागणी केली आहे. चिदंबरम हे चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा दावा सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल २७ तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची चौकशी सुरु केली.


दरम्यान, अटक होण्याआधी काँग्रेस मुख्यालयात बुधवारी चिदंबरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण मी उलट न्यायासाठीच गेले २७ तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे.


ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून भाजपा सरकार बदला घेण्याचे राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेसने आज केली. तर काँग्रेस ही बेलआऊट पक्ष झाल्याची टीका भाजपाने केलीय. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत सीबीआय विरोधात आणि सरकारविरोधात निदर्शने केली आहे. 


पी चिदंबरम सीबीआयला सहकार्य करत नसल्याचे सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी अॅव्हेन्यू न्यायालयात सांगितले.  चिदंबरम यांना दिल्लीतल्या राऊज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात चिदंबरम यांना बसण्यासाठी खुर्ची मागवण्यात आली. पण चिदंबरम यांनी खुर्चीवर बसायला नकार दिला. बुधवारी रात्री चिदम्बरम यांना अटक झाल्यानंतर मध्यरात्रीच्यासुमारस त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, रात्रभर त्यांना सीबीआय मुख्यलयातच ठेवण्यात आले.