पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय आज दिल्लीतील राउज एव्हेन्यू न्यायालयाने दिला. त्यामुळे चिदंबरम यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे त्यांना व्हिडिओ कॉपारन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले.
चिदंबरम यांना याआधी राउज एव्हेन्यू न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मागितलेली एका दिवसाची कोठडी न्यायालयाने नाकारली होती.