मुंबई : आजकाल महिला प्रसूती करता मोठ मोठ्या हॉस्पिटल आणि सुरक्षित प्रसूती होण्याकरता हजारो रुपये खर्च करतो. पण आतापर्यंत कर्नाटकच्या दाई सुलागिट्टी नरसम्मा एकही रुपया न घेता आतापर्यंत 15 हजार महिलांची डिलीवरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सांगायला अतिशय दुःख होत आहे की या दाई या जगात नाहीत. 98 व्या वर्षी दाई सुलागिट्टी नरसम्मा यांनी बंगलुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. 


कर्नाटकच्या अतिशय दुरच्या कृष्णापुरा गावांत राहणाऱ्या दाई सुलागिट्टी नरसम्मा खूप कमी वयापासूनच दाईचं काम करत असतं. त्यांना या कामाचा भरपूर अनुभव होता. 


असं म्हटलं जातं की, गर्भवती महिलांच्या पोटाला स्पर्श करून गर्भातील बाळाची अवस्था सांगत असतं. महिलेच्या पोटावर हात फिरवून सांगत की, महिलेच्या प्रसूतीची योग्य वेळ कोणती आहे. 


आजूबाजूच्या गावातील महिलांच्या प्रसूतीकरता दाई नरसम्मा यांना बोलावलं जात असे. प्रत्येक महिलेला असं वाटे की आपली प्रसूती दाई नरसम्मा यांच्या हातून होऊ दे. 


 



दाई नरसम्मा यांच्याप्रती लोकांचा इतका विश्वास होता की, डॉक्टरकडे जाण्याअगोदर दाई नरसम्मा यांचा प्राथमिक उपचार घेत असतं. प्रसूती करण्याकरता दाई कोणतेही पैसे घेत नसतं. 


त्यांच्या या निःस्वार्थ सेवेकरता त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 


एवढंच नव्हे तर त्यांच समाजसेवेतील हे योगदान बघता त्यांना तुमकुर विद्यालयामार्फत त्यांना डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली.