मुंबई : संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' या सिनेमावर सध्या वाद सुरु आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकांनी म्हटलं आहे की, सेंसर बोर्डने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर ज्यांचा या सिनेमावर आक्षेप आहे त्यांना मोफत सिनेमा दाखवण्यात येईल. ज्याने सिनेमावरुन सुरु असलेला वाद संपेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा सिनेमामध्ये दाखवण्यात येणाऱ्या घटनांना विरोध आहे. इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. राजपूत राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. 


भंसाली यांचं म्हणणं आहे की, असं काहीही नाही आहे. ही फक्त अफवा पसरवली जात आहे. हा सिनेमा पाहून राजपूत समाज देखील वाह-वाह करेल आणि स्वत:वर गर्व करेल. 


सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे की, बोर्ड भंसाली यांना अत्यंत सम्मानाच्या दृष्टीने बघतात. ऐवढच नाही तर राजकारणातील काही लोकं गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा उशीरा रिलीज व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हा सिनेमा रिलीज होण्याआधी इतिहासकारांना दाखवण्यात येणार आहे.