काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या हाजीपूर सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यावेळी भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार केले होते. मात्र, पाकिस्तानने आमचे सैनिक मारले नसल्याचा दावा केला होता. परंतु दोन दिवसानंतर पाकिस्तानच्या लष्कराने दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेताना पांढला झेंडा दाखवला. त्यामुळे पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच पाकिस्तानकडून सीमेवर अशांतता निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाजीपूर सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. ११ सप्टेंबरला ही घटना घडली. पण पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे मृतदेह घेण्यास नकार दिला. अखेर दोन दिवसांनी म्हणजे १३ सप्टेंबरला पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या साथीदारांचे मृतदेह नेले. त्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच यावेळी भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर मिळू नये म्हणून पाकिस्तान सैन्याकडून पांढरा झेंडा दाखविण्यात येत होता.


काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जगभरात पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार करण्यात येत आहे, पण इथेही पाकिस्तान तोंडावर आपटला आहे. १० ते ११ सप्टेंबर दरम्यान सीमेपलीकडून गोळीबार करण्यात येत होता. यावेळी हाजीपूर सेक्टर येथे भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. पाकिस्तानने लष्कराच्या दोन सैनिकांनाही मारले गेले. यानंतर पाकिस्तानी सैन्याला येथे हार पत्करावी लागली आणि त्यानी पांढरा झेंडा भारतीय सैन्याला दाखवून आपल्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतले.


पाहा हा व्हिडिओ :