नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१७ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशीरा अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत सेनेनं जवळच्याच एका इमारतीत दबा धरून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. या घटनेतील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, श


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद पाच जवानांपैंकी दोन जवानांनी 'बुलेट प्रूफ जॅकेट' परिधान केलं होतं. हे जवान कॅम्पच्या गेटवर पहारा देत होते. बुलेट प्रूफ जॅकेट असूनही दहशतवाद्यांच्या गोळीनं त्यांच्या छातीला भेदलं होतं.


चौकशीत खुलासा


बुलेट प्रूफ जॅकेट असूनही हा घात झाल्यानं सुरक्षा एजन्सीसहीत गृह मंत्रालयापर्यंत सगळेच हादरले. जॅकेटमध्ये काही उणीवा आहेत का? हे पाहण्यासाठी पुन्हा चौकशी झाली. परंतु, जॅकेट प्रत्येक टेस्टमध्ये पास ठरलं.


त्यानंतर जवानांना लागलेल्या गोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी, दहशतवाद्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट भेदणाऱ्या खास गोळ्यांचा वापर केल्याचं लक्षात आलं. दहशतवाद्यांकडे या गोळ्या कुठून आल्या? याची चौकशी केल्यानंतर दहशतवाद्यांची मदत करणारं दुसरं कुणी नसून चीन असल्याचं समोर आलंय. 


चीनमध्ये या पद्धतीच्या स्टीलच्या बुलेटस् तयार केल्या जात आहेत ज्या बुलेट प्रूफ जॅकेटसहीत जवानांच्या छातीही भेदू शकतात. चीनकडूनच या गोळ्या दहशतवाद्यांना पुरवल्या जात आहेत.


बुलेट

गोळ्यांमध्ये तांब नाही तर स्टील


दहशतवाद्यांकडून चालवण्यात आलेल्या गोळ्यांचा पुढचा भाग स्टीलचा बनलेला असल्यानं बुलेट प्रूफ शील्ड त्यांना रोखू शकलं नाही. गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एके-४७ रायफलमध्ये वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा पुढचा भाग आत्तापर्यंत तांब्याचा बनलेला असायचा. पहिल्यांदाच चीनी स्टीलनं तयार झालेल्या या बुलेट काश्मीरमध्ये जवानांच्या छातीला भिडल्या... आणि बुलेट प्रूफ जॅकेट निकामी ठरलं.


अमेरिकेची हत्यारं...


इतकंच नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडे सापडलेली हत्यारांमध्ये अमेरिकेनं पाकिस्तान सेनेला पुरवलेल्या हत्यारांचा समावेश होता.


व्हीव्हीआयपींसाठी धोका?


देशातील मोठ्या नेत्यांसाठी आणि इतर व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ कारचा वापर केला जातो. परंतु, दहशतवाद्यांच्या या स्टीलच्या गोळ्या त्यांना सहजच निशाणा बनवू शकतात, अशी भीती आता सुरक्षा यंत्रणांना आहे.