नवी दिल्ली: आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानकडे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमान प्रवासासाठीही पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आपला शेजारी देश हा वित्तीय गैरव्यवस्थापनाचे जिवंत उदाहरण आहे. अतिलष्करीकरण आणि चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तान आर्थिक डबघाईला आला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. परिणामी पाकिस्तानी पंतप्रधानांना विमानाने आंतरराष्ट्रीय समारंभांना जाण्यासाठीही पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. सप्टेंबर महिन्यात इम्रान खान आणि पाकिस्तानचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला हजेरी लावण्यासाठी अमेरिकेत आले होते. त्यावेळी इम्रान खान यांनी सौदीच्या राजपूत्राचे विशेष विमान वापरले होते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 


रोटी आणि नानच्या किंमती कमी करा; इम्रान खान यांचा तातडीचा आदेश


काही दिवसांपूर्वीच एशिया पॅसिफिक समूहाच्या अर्थविषयक कृती समितीने (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले होते. 'एफएटीएफ'ने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली होती. सध्याच्या घडीला पाकिस्तानमधील जीवनावश्यक गोष्टींच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. 


भारताने दु:साहस केले तर चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांची पाकच्या लष्कराला मोकळीक