श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा इथल्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं. भारतीय जवानांनीही पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे भारतीय सीमेवरील घराचं मोठं नुकसान झालंय. या गोळीबारामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सांबा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.