नवी दिल्ली : जम्मूमधल्या ड्रोन हल्ल्यानंतर अनेक प्रश्न नव्यानं समोर आलेत. पाकिस्ताननं चीनकडून पिझ्झाच्या नावावर ड्रोन मिळवले आणि त्यातून भारतावर हल्ला केला. आता याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला तगडी तयारी करावी लागणार आहे. 


पाकिस्तानची ड्रोनमधून बॉम्ब डिलीव्हरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्ताननं पिझ्झा डिलिव्हरीच्या नावावर चीनकडून ड्रोन खरेदी केले.. आणि त्याच ड्रोन्सचा भारतावर हल्ला केला. गुप्तहेरांच्या माहितीनुसार पाकिस्ताननं चीनकडून मोठ्या प्रमाणावर पिझ्झा आणि औषधांच्या डिलिव्हरीसाठी ड्रोन्स खरेदी केलेत. पण अर्थातच पाकिस्तान आणि चीनचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. जम्मूमधल्या एअरबेसवर ज्या ड्रोन्सचा हल्ला झाला त्यातले मिलिट्री ग्रेड स्फोटकं कुठल्याही देशाच्या सैन्याकडेच असतात. या ड्रोन हल्ल्यानं भारताची चिंता वाढवलीय. 


पाकिस्तानी ड्रोन्सना भारत कसं देणार प्रत्युत्तर?


पुलवामा हल्ल्यात स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्यावर धडकवण्यात आली होती. आता तर काश्मीरमधल्या मोठमोठ्या पर्वतांवर ड्रोन हल्ला करणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे. त्यामुळे भारताला या नव्या आव्हानाचा तगडा सामना करावा लागणार आहे. भविष्यात युद्धाचं स्वरुप बदलणार आहे, त्याचा हा ट्रेलर आहे.