इस्लामाबाद : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आइसलॅंड दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी शनिवारी याबद्दल माहिती दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून आइसलॅंड, स्वित्झरलॅंड आमि स्लोवेनिया दौऱ्यावर जाणार आहेत. देशात सुरु असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांवर यावेळी चर्चा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला. काश्मिरमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहता पंतप्रधान इम्रान खान यांनी या निर्णय घेतल्याचे एका मंत्र्याने पीटीव्हीला सांगितले. 


काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला आपली हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केली. दरम्यान मार्चमध्ये त्यांनी आंशिक रुपात उघडण्यात आली होती. पण भारतीय उड्डाणांसाठी ही बंदी कायम राहीली.