Pakistan Occupied Kashmir : पाक व्याप्त काश्मीर भारताचाच आहे. पीओकेची एक एक इंच जमीन भारताची आहे.. पीओकेमध्ये (PoK) लवकरच भारतीय तिरंगा फडकणार आहे. काही दिवस थांबा, पीओके आपोआपच भारतात सामील होईल असं विधान माजी लष्करप्रमुख आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री  जनरल व्ही. के. सिंग (V K Singh) यांनी केलंय. जस्थान दौऱ्यात जनरल व्ही.के.सिंग यांनी हे विधान केलंय. शिया मुस्लिम समुदायाबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी थेट पाकिस्तानला (Pakistan) इशाराच दिलाय. पाकव्याप्त काश्मीर भारताचंच अविभाज्य अंग आहे.. आणि हा प्रदेश भारत आपल्या ताब्यात आणणारच. पाकव्याप्त काश्मीरची जनताही भारतात विलीन होण्याची मागणी करतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच नाही तर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकड्यांना इशारा दिला होता. भारतीय लष्कर पराक्रम गाजवण्यासाठी सज्ज आहे. एका इशाऱ्यावर भारतीय लष्कर पीओके भारतात परत आणेल, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत घोषणा केली आणि राजकारणही सुरु झालं.. चीनने बळकावलेल्या भुभागाच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरलंय.


ऑक्टोबर 1947 रोजी पाक सैन्याने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. पण काश्मीरचा काही भाग बळकावून पाकने त्यावर आपला दावा केला. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचा भाग असूनही पाकिस्तानने त्यावर गेल्या 65- 66 वर्षांपासून बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे. ज्या भागाला आपण पाकव्याप्त काश्मीर असे म्हणतो त्यालाच हे पाकिस्तानी लोक 'आझाद काश्मीर' म्हणतात.


युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख Pakistan administered Kashmir म्हणजेच पाकिस्तान प्रशासित काश्मीर असा करतात.


पाकव्याप्त काश्मीरची जनता पाकड्यांचे अत्याचार झेलतेय. पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने त्यांचा छळ केला जातोय  मात्र जनता बंडखोरी करत रस्त्यावर उतरलीय. पाकिस्तान विरोधात जोरदार प्रदर्शन सुरु आहे. पाकिस्तानी लष्कराला सामान्य जनतेनेच आव्हान दिलंय. तेव्हा तो दिवस आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल.