हाफिज सईदला पाकिस्तानची उघड मदत, बॅंक अकाऊंट वापरण्याची परवानगी
दहशतवादी हाफिजला दिलासा मिळण्यासाठी पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रासमोर मागणी
नवी दिल्ली : दहशतवादी फंडीग प्रकणाशी जोडला गेलेला जमात-उद-दावा चा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतर्फे थोडा दिलासा मिळाला आहे. घरातील खर्च आणि परिवाराच्या पालनपोषणासाठी बॅंक अकाऊंटचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिजला दिलासा मिळण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर मागणी केली होती.
कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गुंजरावाला कोर्टाने हाफिज सईदला टेरर फंडींग प्रकरणी हा निकाल दिला. हाफिजचे प्रकरण पाकिस्तानच्या गुजरातमध्ये वर्ग करण्यात आले आहे. 17 जुलैला हाफिज सईदला गुंजरावाल येथून अटक करण्यात आली होती.
5 ट्रस्टच्या माध्यमातून हे आरोपी दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या संघटनांविरोधात लाहोर, गुजरांवला आणि मुलतान येथे तक्रार दाखल करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात हे पाऊल उचलले.