नवी दिल्ली : पाकिस्तानकडून काही दिवसांपासून सतत सीमेवर फायरिंग होत आहे. गेल्या २ दिवसात याचं प्रमाण वाढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय सीमेपर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानच्या या फायरिंगचं भारत देखील जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. भारताने केलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्या उद्धवस्त झाल्या आहेत. 


पाकिस्तानकडून शनिवारी परगवाल, कृष्णा घाटी आणि अखनूर सेक्टरमध्ये फायरिंग करण्यात आली. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात २३ वर्षीय जवान मनदीप सिंह शहीद झाले आहेत. मनदीप सिंह पंजाबमधील संगरूर जिल्ह्याचे राहणारे आहेत. 


लष्कराचे प्रवक्ते एनएन जोशी यांनी म्हटलं की, 'मनदीप सिंह एक शूर सैनिक होते. देश त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत. आतापर्यंत पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ६ जवान आणि ३ नागरिक जखमी झाले आहेत. फायरिंग अजूनही सुरुच आहे.'