नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारतातर्फे पाकिस्तानला चार ही बाजूने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मसूद अजहर याच संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीनकडून मात्र याला विरोध होत आहे. पाकिस्तानही मसूद अजहरला पाठीशी घालतना दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने 'जैश ए मोहम्मद' चा म्होरक्य मसूद अजहरला बहावलपूर हेडक्वार्टरमधून हटवून दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे मुख्यालय या ठिकाणी आहेत.


अटक आणि सुटका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोर्तुगालच्या खोट्या पासपोर्टवर प्रवास केल्याने मसूद अजहरला 1994 साली भारताने अटक केली होती. त्याआधी 17 वर्षांआधी 1999 मध्ये कंधार विमान अपहरणावेळी त्याला सोडावे लागले होते. मसूद अजहरला आयएसआयची मदत मिळत असल्याचा दावा भारतातर्फे अनेकदा केला गेला आहे.


आंतरराष्ट्रीय दहशतवादी 



पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तानी सेना आणि तेथील आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे पाठबळ असल्याचे पुरावे असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी सेना आणि आयएसआयच्या माध्यमातूनच काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना स्फोटके पुरविली जातात, असे भारतीय लष्कराने म्हटले होते. पुलवामा हल्ल्यामागेही पाकिस्तानी सेना आणि आयएसआयचा हात आहे, असेही भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते.