pm modi security breach : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जिथे अडकला होता तो भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने येथे नेहमीच सुरक्षा असते. या परिसरात अनेक वेळा टिफिन बॉम्ब आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेवर पाकिस्तानी बोट सापडली
नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वीच भारत-पाक सीमेवरील एका गावातून पोलिसांनी टिफिन बॉम्ब जप्त केला होता. आता सीमा सुरक्षा दलाने (BSF) फिरोजपूरमधील सतलज नदीतून पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. रिकव्हरीच्या वेळी बोट रिकामी होती. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. ही बोट इथं कधी आली, त्यात कोण कोण होतं आणि ती इथे आणण्यामागचा हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे.


ही बोट पाकिस्तानी असल्याचा दावा बीएसएफने केला आहे, कारण ज्या ठिकाणी ही बोट सापडली आहे, तिथून सतलज नदी पाकिस्तानमधून वाहत भारतात येते. नदीच्या प्रवाहात ही बोट पाकिस्तानकडून आली आहे. ही बोट अचानक आली असली की कोणीतरी जाणूनबुजून काही कामासाठी पाठवली आहे याचा तपास सुरू आहे. तपासात सहभागी असलेल्या बीएसएफने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही.


बीएसएफ करतंय तपास
सतलज नदीत पाकिस्तानी बोट सापडल्यानंतर बीएसएफने शोध मोहीम सुरू केली आहे. बीएसएफच्या पथकाने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बोटीतून काही लोक भारतीय हद्दीत तर आले नाहीत ना, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, आतापर्यंत काहीही निष्पन्न झालेलं नाही.


दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा ज्या ठिकाणी अडकला होता, तिथून जवळच ही बोट सापडल्याने या प्रकरणाचं  गांभीर्य वाढलं आगे.  पंतप्रधान यांच्या सुरक्षेतील त्रुटी हा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे.