आताची मोठी बातमी! पाकिस्तानचे नापाक मनसुबे, भारतीय हद्दीत शस्त्रानं भरलेली बोट जप्त
भारतीय हद्दीत शस्त्र घेऊन आलेली पाकिस्तानी बोट जप्त, बोटीवर मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : बातमी पाकिस्तानच्या (Pakistan) नापाक मनसुब्यांची. भारतीय हद्दीत शस्त्रे घेऊन आलेली पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आलीय.. या बोटीवर 10 खलाशी, शस्त्रे आणि दारुगोळा होता. सुमारे 40 किलो वजनाचे आणि अंदाजे 300 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थही (Drugs) या बोटीवरून जप्त करण्यात आले. गुजरात एटीएसनं (Gujrat ATS) दिलेल्या गुप्त माहितीनंतर भारतीय तटरक्षक दलानं (Indian Coast Guard) ही धडक कारवाई केली. मुंबईतील 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पाकिस्ताननं पुन्हा एकदा आखलाय की काय, अशी शंका आता उपस्थित केली जातेय.
गुजरात एटीएसने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात (Arabian Sea) मोठी कारवाई केली. 25 आणि 26 डिसेंबरच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाने हे ऑपरेशन राबवलं. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुद्री सीमारेषेवर भारतीय तट रक्षक दलाने ICGS अरिजय जहाज तैनात केलं होतं.
मिळालेली माहिती एकदम खरी ठरली. भारतीत तटरक्षक दलाने समुद्र हद्दीजवळ अल सोहेली नावाच्या पाकिस्तानी मच्छिमाराला अटक केली. त्याच्या चौकशीत एका बोटीत शस्त्रसाठा, दारुगोळा आणि जवळपास 40 किलोग्राम अंमली पदार्थ आढळले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 300 कोटी रुपये किंमत आहे. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी खलाश्यांना पुढच्या चौकशीसाठी ओखाला आणलं जाणार आहे.