मुंबई : पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा कट हाणून पाडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचरयंत्रणा ISIच्या इशाऱ्यावर हे दहशतवादी भारतात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. यापैकीच एक दहशतवादी ओसामानं घातपाताचं थेट दुबई कनेक्शन उघड केलं आहे.


टेरर मॉडेलचा मास्टरमाईंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओसामाचा पिता उसैदुर रहमान या ISI टेरर मॉडेलचा मास्टरमाईंड होता. तो दुबईत मदरसा चालवायचा. ISIच्या सूचनेनुसार त्यानं भारतात हल्ल्याची तयारी केली होती. ओसामाचा काका हुमैदुर रहमान हा देखील या कटात सहभागी होता अशी माहिती आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार ओसामानं मध्य पूर्वेतल्या अनेक देशांमध्ये प्रवासही केला आहे. आता दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि यूपी एटीएसनं ओसामा राहत असलेल्या कानपूरमध्ये कसून चौकशी सुरू केली आहे.



मुंबईत राहणारा जान मोहम्मद शेख डी कंपनीच्या संपर्कात असल्याचं आधीच स्पष्ट झालंय. जान मोहम्मद हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या सूचनेनुसार काम करत होता. 


एकीकडे दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि आयबीचे अधिकारी या प्रकरणातले बारकावे शोधून काढत आहेत. तर दुसरीकडे मुंबई ATSची टीमही दिल्लीत दाखल झाली आहे. आता या तपासातून पाकचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आहे.