नवी  दिल्ली : सख्खा शेजारी आणि पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांत अशी वक्तव्यं समोर आलीत, की त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेला पाकिस्तान चक्क शांतीचा सूर आळवताना दिसतोय. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी ताजा ताजा शांती राग आळवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्ताननं जुन्या गोष्टी विसरून नव्यानं पुढं जाण्याची हीच वेळ आहे. दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये शांतता नांदली तर दक्षिण आणि मध्य आशियाचा विकास होण्यास मदत होईल, असं वक्तव्य बाजवा यांनी इस्लामाबादेत बोलताना केलं...


हे तेच बाजवा आहेत, जे वारंवार भारताविरुद्ध युद्ध लढण्याच्या पोकळ वल्गना करायचे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतासोबत संबंध सुधारण्याचं सूतोवाच केलं होतं.


हमारे आर्थिक संबंध मजबूत हों, दोनों देशों के बीच कनेक्टिविटी बढ़े, इस्लामाबाद तो सीधे कनेक्ट हो जाता है सेंट्रल एशिया तक, हम तो अपनी कोशिश करेंगे लेकिन हिंदुस्तान पहला कदम उठाना पड़ेगा, जब तक वो पहला कदम नहीं लेते, दुर्भाग्य से हम आगे नहीं बढ़ सकते. 


मात्र पाकिस्तानचा हा शांतीचा सूर केवळ दिखावा आहे. कारण आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संघटना भारताच्या विरोधात नव्या कारवाया करत असल्याचे समोर आले आहे.


  • पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन डिव्हिजन तयार केली आहे.

  • या विभागाची जबाबदारी आयएसआयकडे सोपवण्यात आली आहे.

  • या विभागाच्या बैठकीत ISIनं भारताला बदनाम करण्याचा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

  • काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येमध्ये सैन्यदलाकडून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची बनावट प्रकरणं आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा ISIचा डाव आहे.



दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानचा चेहरा आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड झाला आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्यामुळे पाकिस्तान FATF च्या काळ्या यादीत आहे. त्यात पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळं भारतासोबत शांतता चर्चा करणं ही सध्या पाकिस्तानची मजबुरीच बनली आहे.