नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अरनियामध्ये सुरुंगाच्या माध्यमातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना भारत-पाक सिमेवर एक सुरुंग आढळून आला आहे. त्यामुळे या सुरुंगातून भारतात प्रवेश करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन फसला आहे. मात्र, बीएसएफने केलेल्या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.


अरनिया हा भाग पाकिस्तान सीमेला लागून आहे त्यामुळे या परिसरातून दहशतवादी नेहमीच भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सुरुंगाच्या माध्यमातून दहशतवादी भारतात प्रवेश करणार होते. त्यानंतर सणा-सुदीच्या काळात घातपात घडविण्याचा त्यांचा डाव होता.


गेल्या एक महिन्यापासून सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या वर्षभारात भारतीय सैन्याने आतापर्यंत १२५हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.