पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक, ३१ मार्चपर्यंत मुदत
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?
नवी दिल्ली : ३१ मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे. पॅन आधारला लिंक करण्याची तारीख वाढवलेली आहे. २७ जानेवारी २०२० पर्यंत ३० करोड ७५ लाख लोकांनी पॅन कार्डला आधारसोबत लिंक केलं आहे. १७ करोड ८५ लाख पॅन कार्ड अजून सुद्धा आधारसोबत लिंक करणं बाकी आहे. पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक असून ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. पॅन आधारसोबत लिंक केलं नसेल तर करणं आवश्यक असणार आहे.
जर पॅन कार्ड हे आधार सोबत लिंक केलं नाही तर पॅन कार्ड निष्क्रीय ठरवलं जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवरूनह ही आधार-पॅन लिंक करण्याची सुविधा आहे. तुमची माहिती भरुन तुम्ही आधार आणि पॅन लिंक करु शकता.
आधार-पॅन कसं लिंक कराल?
- सगळ्यात आधी आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला साईडला एक लाल रंगाचं बटण दिसेल. या बटणावर 'लिंक आधार' असं लिहिलं असेल.
- जर तुमचं अकाऊंट बनलं नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
- लॉगिन केल्यानंतर वर दिसत असलेल्या प्रोफाईल सेटिंग मध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करण्याच्या ऑप्शनवर जा.
- हा ऑप्शन उघडल्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि कोड टाकावा लागणार आहे. हे भरल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल.
- तुम्ही मोबाईलवरूनही हे करु शकता. 567678 किंवा 56161 वर एसएमएस करुन तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करु शकता.