मुंबई : परमनंट अकाऊंट नंबर (PAN) म्हणजे पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. तुमचा पगार कर सवलतीपेक्षा जास्त असेल तर तुमच्याकडे पॅन नंबर असणे गरजेचे असते. याआधी पॅनकार्ड बनवण्यासाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत असे. पण आता ऑनलाईन अर्ज केले जातात. असा अर्ज करणे खूपच सोपे आहे. काही मिनिटांतच तुम्हाला पॅन कार्ड मिळून जाते. अर्ज केल्यानंतर तात्काळ तुम्ही ई पॅन डाऊनलोड करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल २०१७ मध्ये टॅक्समध्ये देशातील सर्वात मोठी संस्था सीबीडीटीने ई पॅनची सुविधा सुरु केली. तुम्ही ई पॅनसाठी अर्ज केलात तर तुम्हाला सीबीडीटी ईमेलवर पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवते. 


तुम्ही तुमच्या ईमेल आयडीवरु पॅन डाऊनलोड करु शकता. पॅन कार्ड हरवणे, फाटणं किंवा खराब झाल्यास डुप्लीकेट येईपर्यंत ई पॅन डाऊनलोड करु शकता.


इनकम टॅक्स विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर जा. तिथे Instant PAN through Aadhaar या सेक्शनवर क्लिक करा.त्यानंतर डावीकडे Quick Links वर क्लिक करा.  त्यानंतर Get New PAN वर क्लिक करा. 


नव्या पॅनकार्डसाठी तुमचा आधार कार्ड नंबर आणि Captcha कोड टाकून आधार लिंक मोबाईल फोनवर OTP तयार करा. आणि त्यात टाका. 


आधारवरील माहिती भरा 


पॅन कार्डसाठी भाषा निवडा.


आधार नंबरच्या ई-केवायईसी डेटा UIDAI शी जोडल्यानंतर तात्काळ पॅन नंबर मिळेल.



असे करा e-PAN डाऊनलोड ?


https://www.myutiitsl.com/PAN_ONLINE/PANApp 


या लिंकवर जाऊन इंडीव्युजुअलवर क्लिक करा. 
सिलेक्ट द रिक्वायर्ड निवडा
पॅन आणि ई पॅन सिलेक्ट करुन विचारलेली माहिती भरा 
सर्वात खालचे सबमिट बटणवर क्लिक करा 
पूर्ण फॉर्म भरल्यानंतर अधिकारी माहिती तपासतील.
काही वेळातच तुमच्या ईमेल वर पीडीएफ फॉर्मेटमध्ये ई पॅन मिळेल.