PAN Card: चार महिन्यात पूर्ण करा हे काम, अन्यथा पॅनकार्ड होणार बंद!
PAN Card: पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
PAN Card Updation: पॅनकार्ड आणि आधारकार्ड हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त आहे. तर आधारकार्ड ही त्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे. पॅनकार्डच्या मदतीने आयकर भरता येतो. पॅनकार्डवर 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो. कर चुकवेगिरी टाळण्यासाठी हा नंबर महत्त्वाचा असतो. 1 जानेवारी 2005 पासून कोणत्याही चलनासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन नंबरद्वारे विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते. पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणताही भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक
गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची सूचना केली जात आहे. आता याबाबत आयकर विभागाने एक महत्त्वाची सूचना केली आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही त्यांना आणखी काही महिन्यांचा अवधी दिला आहे. म्हणजेच 4 महिन्यांचा अवधी दिला आहे. आयकर विभागाने ट्विट केले की, 'आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी जे सवलत श्रेणीत येत नाहीत, त्यांना आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल.' अशा परिस्थितीत पॅन कार्ड निष्क्रिय होण्यापासून वाचवण्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे.
बातमी वाचा- Axle Counter Box: रेल्वेरुळाच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय असतं? जाणून घ्या
आधारशी लिंक करा
www.incometax.gov.in वर 1000 रुपये शुल्क भरून वैध आधार कार्डसोबत पॅन लिंक केले जाऊ शकते. आयकर विभागाने म्हटले आहे की, जे सर्व पॅनधारक 11 मे 2017 च्या अधिसूचना क्रमांक 37/2017 नुसार सूट श्रेणीत येत नाहीत. ज्यांनी अद्याप त्यांचे आधार त्यांच्या पॅनशी लिंक केलेले नाही. त्यांनी शक्य तितक्या लवकर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करावं.