PAN कार्डच्या नावात बदल करण्याची सोपी पद्धत; घरबसल्या करू शकता हे काम
Pan card correction form : पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो.
मुंबई : पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो. त्याशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही.
पॅन कार्ड आयकर प्राधिकरणाला व्यक्ती किंवा कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा रेकॉर्ड ठेवते. त्यामुळे करचुकवेगिरीची शक्यता कमी होण्यास मदत होते. पॅन कार्डमधील पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी कार्डधारकांना 110 रुपये शुल्क भरावे लागेल.
याशिवाय अनेक कामांसाठी पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. युजर लग्नानंतर पॅन कार्डवरील आडनाव आणि पत्ता देखील बदलू शकतात. बँक असो किंवा इतर कोणताही आर्थिक व्यवहार असो, तुमचा पॅन क्रमांक देणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला घरबसल्या पॅन कार्डवर बदल करण्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या.
पॅन कार्डवरील नाव बदलण्याची पद्धत
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड https://nsdl.co.in/ च्या वेबसाइटवर जा.
Correction in Existing PAN पर्याय निवडा
कैटेगरी टाइप पर्याय निवडा
योग्य नाव आणि अचूक शब्दलेखन असलेली कागदपत्रे जोडा.
पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी, कार्डधारकांना 110 रुपये शुल्क द्यावे लागेल.
NSDL पत्त्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा / इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस UNIT (NSDL e-Governance Infrastructure Limited द्वारे व्यवस्थापित) वर अर्ज पाठवा.
अपडेट केलेले पॅन कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.
31 मार्चपर्यंत शेवटची संधी
आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक केले नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. यासाठी आयकर कायद्यात नवीन कलम 234H जोडण्यात आले आहे.
पॅन-आधार लिंक न केल्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्युच्युअल फंड शेअर्समध्ये गुंतवणूक करता येणार नाही. कोणतेही नवीन बँक खाते उघडू शकणार नाहीत किंवा जुन्याचे केवायसी करू शकणार नाहीत. या प्रकारच्या कामासाठी वैध पॅन कार्ड आवश्यक आहे.