राम रहिमची मुलगी हनीप्रीतवर देशद्रोहाचा आरोप
राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसा विरोधात पंचकूला पोलिसांनी लूकआऊट नोटीस जाहीर केली आहे. पंचकूला पोलिसांनी हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पंचकूला : राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसा विरोधात पंचकूला पोलिसांनी लूकआऊट नोटीस जाहीर केली आहे. पंचकूला पोलिसांनी हनीप्रीतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
यासोबत हनीप्रीतवर राम रहिमला कोर्टातून पळवून नेण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तसेच पंचकूलामध्ये हिंसा भडकवण्याचा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे. राम रहिमला जेव्हा सीबीआय कोर्टात नेण्यात आलं तेव्हा हनीप्रीत त्याच्यासोबत होती.
पापाची परी -
हनीप्रीत राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. सोशल मीडियात तिने स्वत:ला ‘पापाची परी, दिग्दर्शक, एडिटर आणि अभिनेत्री’ असल्याचं सांगितलं आहे.
राम रहिमच्या सिनेमात काम -
हनीप्रीतने राम रहिमच्या सिनेमात अभिनय आणि दिग्दर्शन केलं आहे. हनीप्रीतने ‘एमएसजी २-द मेसेंजर’ यात काम केलं आहे. तर ‘एमएसजी - वॉरिअर लायन हार्ट’ मध्येही भूमिका केली आहे. राम रहिमचं लग्न हरजीत कौरसोबत झालं आहे. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे.
हनीप्रीतच्या पतीचे राम रहिमवर आरोप -
मीडिया रिपोर्टनुसार, हनीप्रीतचं लग्न राम रहिमने लावून दिलं होतं. मात्र, हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ता याने राह रहिमवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. दोघांना सोबत विवस्त्र बघितल्याचे त्याने सांगितले आहे.