रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाणी पुरीच्या गाड्यावरील तिखट गोड पाणीपुरीवर ताव मारायला कोणाला आवडत नाही? लहान असो व मोठे सर्वानाच पाणी पुरी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं.  मुंबई मध्ये प्रत्येक गल्ली नाक्यावर पाणी पुरीचे ठेले असतातच. त्यांच्या बाजूला तोबा गर्दी असते. तिखट पाण्यामुळे डोळ्यातून पाणी येत असताना सुद्धा आणखी एक ''भैया और एक बनाओ'', ''तिखा चाहिये', असे अनेक  संवाद आपण पाणी पुरीच्या गाड्यावर नेहमीच ऐकत असतो.
 
रस्त्यावर खाणं हे कितीही म्हटलं तरी आरोग्याच्या दृष्टीने घातकच. उघड्यावरचे पदार्थ त्यात पाणी पुरी बनवण्यासाठी वापरण्यात येणार साहित्य, पाणी हे सर्व किती योग्य असेल किती स्वच्छ असेल हे काही सांगता येत नाही पोरीनामी आपण आजारी पडतो आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी, घरी पाणी पुरी बनवण्याचा बेत आखला जातो. पण घरी कितीही आणि कशीही बनवा मात्र घरच्या पाणीपुरीला ठेल्यावरची चव काही येत नाही. 
पण आता काळजी नसावी, घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पाणी पुरी बनवण्याची एक सिक्रेट रेसिपी सापडली आहे ती वापरून, तुम्ही घरच्या घरी अगदी अफलातून पाणी पुरी बनवू शकता. 


साहित्य 


  • पुदिना - १ जुडी 

  • कोथिंबीर - १ जुडी 

  • जलजीरा पावडर - १ चमचा 

  • कढीपत्ता - ४-५ पानं 

  • हिरव्या मिरच्या - ५ ते ६ 

  • जिरे पावडर - १ टेबलस्पून 

  • पाणीपुरी पावडर मसाला - १ ते १. १/२ टेबलस्पून 

  • हिंग - १/२ टेबलस्पून 

  • मीठ - चवीनुसार 

  • लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

  • पाणी - गरजेनुसार 

  • जिरे - १/२ टेबलस्पून 

  • कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

  • खारी बुंदी - आवडीनुसार 

  • लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 


कृती


सर्वप्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यात  कोथिंबीर , पुदिना, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जलजिरा पावडर, पाणीपुरी पावडर मसाला, हिंग मीठ, लिंबाचा रस, पाणी, लाल मिरची पावडर, आवश्यकतेनुसार मीठ घालून चांगलं बारीक करून घ्या. बारीक करत असताना आवश्यकतेनुसार पाणी घाला.


घट्ट आणि पातळसर अशी पेस्ट बनवून घ्या. आता त्यात १/२ टेबलस्पून जिरे, कोथिंबीर अगदी बारीक चिरून टाका, आवडीनुसार खरी बुंदी घालून पाणीपुरीच्या तिखट पाणी खाण्यासाठी तयार. हे पाणी गरमागरम रगड्यासोबतसुद्धा छान लागेल.