मुंबई : नव्या वर्षात सर्व व्यावसायिक वाहनांसाठी आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी लोकेशन ट्रॅकिंग यंत्रणा आणि आपातकालीन सूचना देणारी व्यवस्था बसवणं बंधनकारक असणार आहे. रस्ते सुरक्षा मंत्रालयानं याबाबतचं परिपत्रक जारी केलंय. या अटींची पूर्तता केल्याशिवाय वाहनांची नोंदणीच शक्य होणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हणण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकेशन ट्रॅकिंग आणि आपातकालीन सूचना देणारी यंत्रणा गाड्यांमध्ये लावण्याबाबत राज्य सरकारांनी आपापल्या राज्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्यात.


रिक्षा, ई-रिक्षा आणि इतर तीन चाकी वाहनांना मात्र हा नियम लागू नसेल. अपघातानंतर तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे. 


या यंत्रणांचं उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांकडून नफेखोरीचे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही राज्य सरकारांना करण्यात आल्यात.