Accident News : हरियाणाच्या (haryana) पानिपत (panipat) शहरात गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. बाल्कनी अंगावर कोसळल्याने (wall collapse on biker) एका बाईकस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत व्यक्तीची पत्नी थोडक्यात बचावली आहे. पानिपत येथील पचरंगा बाजार येथे बाईकवरून जात असताना 80 वर्षांच्या जीर्ण घराची बाल्कनी पडल्याने या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एका स्थानिकाचा पायही तुटला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचरंगा मार्केटमधील जीर्ण इमारतीचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याच्या अंगावर विटांसह घराच्या बाल्कनीची भिंत पडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे ज्यात संपूर्ण बाल्कनी बाईकवर पडल्याचे दिसून आलं आहे. अपघातानंतर लोकांनी तात्काळ विटाखाली दबलेल्या जोडप्याला बाहेर काढले. मात्र, यादरम्यान बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पत्नीही जखमी झाली आहे.


बँकेतून काम संपवून पचरंगा बाजारातील दुकानात परतत असलेला ईशकुमारही या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. जखमी ईश कुमार यांनी सांगितले की, अचानक इमारतीची बाल्कनी त्याच्या अॅक्टिव्हावर पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आणि बाल्कनीचा भाग त्याच्या मागून येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडला. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी जखमी झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुटाणा गावातील रहिवासी असलेले पती-पत्नी पानिपतच्या गुळाच्या बाजारात माल घेण्यासाठी आले होते. दोघेही बाईकव होते. बाजारातून जात असताना अचानक घराची बाल्कनी त्याच्या अंगावर पडली. यामध्ये बाईक चालक सुशील यांच्यावर बाल्कनी कोसळली. यामुळे कुमारच्या पोटातील सर्व आतडे बाहेर आले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.



मालकाचा निष्काळजीपणा


या दुर्घटनेत घरमालक आणि कामगारांचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. कारण या इमारतीवर बांधकाम सुरू होते. कोणात्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय हे काम केले जात होते. त्यामुळे जीर्ण बाल्कनी कोसळून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक सतीश गौतम यांनी सांगितले की, जुन्या घराची बाल्कनी कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.कायद्याच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. सध्या मृतदेह मृताचे शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.