मॉकड्रिलमध्ये 22 रुग्णांचा जीव घेणाऱ्या रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर
या निर्णयाचा देशभरातील अनेकांनी सोशल मीडियावर विरोध केला आहे. यामुळे सरकरच्या हेतूवर प्रश्नचिन्हं निर्माण होण्याची शक्यता आहे.
आग्रा : मॉकड्रिलमुळेच रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. मॉकड्रिलमुळे 22 रुग्णांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तर रुग्णालयाबाबत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आग्रा रुग्णालयात 5 मिनिटं ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे ICU मधील 22 रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ आली. या रुग्णालयाबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
सरकारच्या नव्या सूचनांनंतर गुरुवारी आग्राच्या आरोग्य विभागाने 22 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या रुग्णालयाची नोंदणी पूर्ववत केली आणि सील उघण्यात आलं. या निर्णयावर लोक आक्षेप घेत आहेत आणि सरकारने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी लोकांनी मागणी केली आहे.
26 एप्रिलला आग्रात घटना
पारस रुग्णालयात 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी 26 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेच्या सुमारे 2 महिन्यांनंतर म्हणजे 7 जून 2021 रोजी हॉस्पिटलच्या मालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते सांगत होते की, गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनही फार उपलब्ध नव्हते.
ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता लक्षात घेऊन 5 मिनिटं मॉकड्रिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होतं. 5 मिनिटं ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय बंद करण्यात आला. त्यामुळे 22 रुग्णांचा जीव गेला. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सील करण्यात आलं होतं. आता हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा देशभरातील अनेकांनी सोशल मीडियावर विरोध केला आहे. यामुळे सरकरच्या हेतूवर प्रश्नचिन्हं निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणी सरकार फेरविचार करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.