पणजी : केरळ आणि महाराष्ट्रात ब्लू व्हेल खेळाच्या विळख्यात अडकून दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणाईमध्ये आणि इंटरनेटवर या खेळाचे लोण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण  वाढत आहे. 


ब्लू व्हेल खेळाची वाढती भीती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने गोवा पोलिसांनी पालकांना सूचना काही सूचना आणि सल्ले दिले आहेत. गुरूवारी अपराध शाखेकडून हे सल्ले देण्यात आले आहेत.  


अपराध शाखेचे पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी पालकांना सूचना देताना सांगितले, '  ब्लू व्हेल खेळामध्ये अडकलेली मुलं नैराश्यात असू शकतात किंवा या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलू शकतात.  तुमच्या  मुलांच्या वागण्या-बोलण्यात होणारे बदल दुर्लक्षित करू नका. त्यामधूनच मुलं मानसिक त्रासात आहेत का ? याबाबतचे संकेत मिळतात.