लोकसभा निवडणुक २०१९ चा बिगूल आखेर वाजला. विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाल्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काहीच दिवस बाकी असताना देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. याकाळात नेत्यांची हेरा फेरी होताना दिसत आहे तर काहींनी निवडणुक न लढवण्याचा पावित्रा घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नाहीत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवडणूक न लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून 2014 साली परेश यांनी भाजप पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढवली होती. मागील दहा वर्षापासून अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. काँग्रेसच्या हिंमतसिंह यांच्या विरोधात परेश रावल यांनी निवडणुक लढवली होती. मागील निवडणुकीत अभिनेता परेश रावल यांना 6 लाख 33 हजार 582 मते मिळली होती तर हिंमतसिंह यांना 3 लाख 6 हजार 949 मतांवर समाधान मानावे लागले होते.


भाजपाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजपाने ४० लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाच्या तिसऱ्या यादीत गिरिराज सिंह यांना बेगूसराय येथून तर पाटनातील साहिब येथून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जमुई येथून चिराग पासवान, रामकृपाल यादव यांना पाटीलपुत्र, राधा मोहन सिंह पूर्व चंपारण, राजीव प्रताप दुबे यांना सारण येथून उमेदवारी देऊन रिंगणात उतरवण्यात आले आहे.