नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरु होणार आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. आज मोदींच्या उपस्थित पहिली कॅबिनेट बैठक घेण्यात आली. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसऱ्या मोदी सरकारचे पहिले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून २६ जुलैदरम्यान होणार असल्याचे एएनआयने खात्रीलायक सूत्रांच्या आधारे दिले आहे. तसेच लोकसभेच्या अध्यक्षांची निवड १९ जूनला होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ जूनपासून संसदेचे बजेट सत्र सुरू होईल आणि २६ जुलै रोजी संपणार आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीदरम्यान पहिल्या संसदेच्या सत्राची तारीख निश्चित करण्यात आली. एका वरिष्ठ सरकारी अधिका-याने पीटीआयला माहिती देताना सांगितले, संसदेचे अर्थसंकल्प १७ जून ते २६ जुलै दरम्यान होणार आहे, ज्यामध्ये नियमित बजेट सादर केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत संसदेच्या सत्राची तारीख निश्चित करण्यात आली.


मोदी सरकारची आज नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यावेळी शहिदांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीची निवृत्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार १४.५ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे.