रामराजे शिंदे, नवी दिल्ली, झी मीडिया : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) आणि पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना संसदेच्या विशेषाधिकार समितीनं नोटीस बजावली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनाही नोटीस बजावण्यात आलीय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आलीय. (parliamentary privileges committee issues notice to mumbai police commissioner sanjay pandey after mp navneet rana complaint)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नोटीसनुसार संजय पांडे यांना  15 जूनला संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजार राहण्याचे आदेश नोटीसीमध्ये देण्यात आलेत. नवनीत राणा तुरुंगात असताना त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल राणांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार करण्यात आली होती.


कोण आहेत संजय पांडे?


सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.