Goa Tourism : दरवर्षी देशभरातून अनेक प्रवासप्रेमी काही भागांना हमखास भेट देतात. अशा ठिकाणांमध्ये अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे गोवा. तिथे मनाली, लेहला (Manali Leh) जाण्यासाठी जितकं प्राधान्य दिलं जात नाही तितकं प्राधान्य निळाशार समुद्र किनारा लाभलेल्या गोव्याला दिलं जातं. गोव्याची संस्कृती (Culture in goa), कशाचीही तमा न बाळगता करता येणारा कल्ला आणि इतक्या गजबजाटातही तिथं असणारी शांतता हे सर्वकाही अनेकांनाच हवंहवंसं वाटतं. (Tourism) पर्यटनाच्या बळावर मोठ्या आर्थिक उलाढाली करणाऱ्या याच गोव्यामध्ये पर्यटकांच्या दृष्टीनं आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातच आता आणखी एका निर्णयाची भरही पडली आहे. (Party hub Goa to create new cultural map know details latest Marathi news)


गोव्याचा नवा नकाशा साकारणार... (Goa) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा सरकारच्या (Goa state Government) एकंदर हालचाली पाहता येत्या काळात PM Gati Shakti या राष्ट्रीय स्तरावरील पोर्टलच्या आधारे गोव्याचा नवा नकाशा तयार करण्यात येणार आहे. हा गोव्याचा सांस्कृतिक नकाशा असेल. ज्यामध्ये सर्वसाधारण नकाशासोबतच राज्यात येणाऱ्या स्थानिक आणि परदेशी प्रवाशांसंदर्भातील माहितीसुद्धा देण्यात येणार आहे. केंद्राच्या आर्थिक पाठबळाशिवाय राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या आधारे या गोष्टी साकारल्या जाणार आहेत. 


गोव्याच्या सांस्कृतिक नकाशामध्ये काय असेल? 


गोव्याचा सांस्कृतिक नकाशा तयार करताना त्यात अनेक गोष्टी दृष्टीक्षेपात घेतल्या जातील. यामध्ये राज्यातील विविध महोत्सव (Festivals), विविध कार्यक्रम, विविध ठिकाणी जाण्यासाठी आकारलं जाणारं प्रवेश शुल्क इत्यादींची माहिती या GIS Map वर उपलब्ध असेल. 


गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि पर्यटन विभागाकडून या संकल्पनेवर काम केलं जाणार आहे. ज्यामध्ये धार्मिक स्थळांपासून संग्रहालयांपर्यंतची माहिती उपलब्ध होईल. गोव्यत येणारे आणि इथं असणाऱ्या विविध पर्यटनस्थळांना भेट देणारे पर्यटक, त्यांची संख्या, पर्यटनस्थळी असणाऱ्या सुविधा या साऱ्याच्या आधारे या संकल्पनेसाठीची माहिती एकत्रित केली जाणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Best Food Restaurant in Goa : गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या


गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि सहाजिकच राज्यातील नागरिकांसाठी प्रशासन विविध उपक्रम राबवताना दिसत आहेत. हे पाऊलही त्याचाच एक भाग म्हणायला हरकत नाही. 


तुम्ही सध्या गोव्यात आहात का? 


(places to visit in goa) तुम्ही सध्या गोव्यात आहात का? वस्तूस्थिती म्हणावी तर हा गोव्यामध्ये फिरण्यासाठी जाण्याचा योग्य वेळ नाही असं अनेकांचं मत. पण, याच काळात गोव्यात हॉटेलं आणि पर्यटनविषयक सुविधांचे दर कमी असतात. त्यामुळं अनेकजण या दिवसांतही गोव्यात जाण्याला प्राधान्य देतात. सध्या मात्र हवामनात होणारे बदल आणि किनारपट्टी भागात अपेक्षित उष्णतेची लाट पाहता दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा, शरीरतील पाण्याच्या पातळीत समतोल राखला जाईल याकडे लक्ष द्या असं आवाहन सर्वांनात करण्यात येत आहे.