Garba Dance : सध्या संपुर्ण देशात नवरात्री महोत्सवाचा जल्लोष दिसून येत आहे. गरबा- दांडियाचे कार्यक्रम ठिकठिकाणी साजरे केले जात असल्याचं पहायला मिळतंय. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्यामुळे आता गरबा दांडियाचा उत्सव शिगेला पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावर नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं चित्र दिसतं. मात्र, नुकतंच बंगळुरू विमानतळावर काहीसं वेगळं चित्र दिसून आलं. या विमानतळावर प्रवासी चक्क गरब्यावर ठेका धरताना दिसून आलं (Garba Dance At Bengaluru Airport). याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


सगळे प्रवासी गोल मोठं रिंगण करून गरब्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. काही प्रवाश्यांनी तर गरब्याचा पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे. त्याचवेळी बाकीचे प्रवासी मोबाईलवर शूट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या गरब्यामुळे घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या विमानाला देखील थांबावं लागलं.


"ती ओरडत होती, मी तिचा व्हिडीओ पाहिलाय", Ankita Bhandari प्रकरणात कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा!


दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक महिला घागरा-चोलीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केलाय. तर अनेकांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसला हा व्हिडीओ झळकताना दिसतोय.


पाहा व्हिडीओ-